Kangana Ranaut: कंगना रणौतचा मोदींबाबत मोठा दावा, म्हणाली, ‘2024 मध्ये फिर मोदी…’
Kangana Ranaut: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनीच जय्यत तयारीला सुरूवात केली आहे. ( lok sabha election) यामुळे सगळीकफडे सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाने ३०० हुन जास्त जागाचे टार्गेट देखील ठरवले आहे. (election) आगामी निवडणुकीकरिता सत्तांतर होणार की नाही? (Govt) मोदी सरकार (Prime Minister Narendra Modi) सत्तेवर राहणार यावर देखील सध्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
View this post on Instagram
आगामी ‘निवडणुकीबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे, पण 2024 मध्येही तेच घडेल जे 2019 मध्ये झाले होते.’ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) 353 जागा जिंकल्या आणि सत्तेत परतले. असा मोठा दावा कंगनाने केला आहे.
आगामी ‘इमजरन्सी’ या सिनेमाच्या कामात व्यस्त असलेली कंगना काल हरिद्वारला गेली होती. तिथे तिने गंगा आरतीही केली आहे. यानंतर तिने माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीवर कंगनाने देशाच्या राजकारणावर सतत आपली भूमिका घेतली आहे. देशपातळीवर घडणाऱ्या अनेक घडामोडींवर ती व्यक्त होत असते.
यामुळे ती आगामी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा देखील सध्या जोर धरत आहे. तमिळ राजकारणी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘थलाइवी’ सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात कंगना रणौतने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान, “माझ्या चाहत्यांची इच्छा असेल तर मला राजकारणात उतरायला आवडणार आहे”, असं ती म्हणाली होती.
Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती
कंगना सध्या ‘इमरजन्सी’ सिनेमाच्या कामात खूप व्यस्त आहे. तिने दिग्दर्शित केलेला हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यामध्ये इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका कंगना रणौतने साकारली आहे.
अनुपम खेर, महिमा चौधरी, विषक नायर आणि श्रेयस तळपदे असे मोठे कलाकार या सिनेमात चाहत्यांना दिसणार आहेत. तेजस हा सिनेमाही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, ती या सिनेमात एका भारतीय हवाईदलाच्या पायलटची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.