Download App

loksabha Election : चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार -प्रतिभा धानोरकरांमध्ये लढत

  • Written By: Last Updated:

Congress Maharashtra third candidate List : काँग्रेसने लोकसभेसाठी (loksabha Election) राज्यातील तिसरी यादी जाहीर केली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर व भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने राज्यातील बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.


Loksabha उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर नतमस्तक पाहा फोटो

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत देशभरातील पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. पाचव्या यादीत केवळ तीनच नावे आहेत. चंद्रपूर आणि राजस्थानमधील दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

नगरमध्ये राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू, विखेंसाठी शिंदे आणि अजितदादांकडून मोर्चेबांधणी


आतापर्यंत काँग्रेसचे बारा उमेदवार जाहीर

काँग्रेसने राज्यातील तीन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात पहिल्या यादीत सात जागा होत्या. तर दुसऱ्या यादीत चार जागांवरील उमेदवार होते. आता तिसऱ्या यादीत एक उमेदवार जाहीर झाला आहे. आतापर्यंत काँग्रेसने बारा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु राष्ट्रवादी, ठाकरे गटाचाही एकही उमेदवार अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.

प्रतिभा धानोरकरांच्या पारड्यात वजन, वडेट्टीवारांना झटका

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले होते. या जागेवर पोटनिवडणूक झाली नाही. या जागेवर त्यांची पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आपली मुलगी शिवानी यांच्यासाठी प्रयत्नशील होते. या जागेसाठी धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होती. परंतु अखेर धानोरकर यांना पक्षाने लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे.

follow us