सुधीर मुनगंटीवारांच्या माजी पीएला लाथाबुक्क्यांनी चोप

सुधीर मुनगंटीवारांच्या माजी पीएला लाथाबुक्क्यांनी चोप

चंद्रपूर : नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एका व्यक्तीनं लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

धवने यांनी मारहाण करत असलेल्या व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 लाख रुपये घेतल्याचा आरोप सदर व्यक्तीनं व्हिडीओमध्ये केला आहे. धवणे यांनी नोकरीच्या अनेक जनांना गंडा घातल्याचं बोललं जातंय. नोकरीच्या नावावर व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाकडून तीस ते पस्तीस लाख रुपये उकळल्याचं चर्चा व्हिडीओमध्ये सुरु असल्याचं ऐकायला मिळत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी धवणे यांना कामावरून काढल्याचं सांगितलं जातंय.

राज्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आदरानं घेतलं जातं. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते देखील मुनगंटीवार यांचं नाव आदरानं घेतात, राज्याचे अर्थमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघात मोठा विकास केल्याचं पाहायला मिळतंय. त्यातचं आता मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवने यांना मारहाण झाल्याचा व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडीओमध्ये धवने यांनी मुनगंटीवारांचे स्वीय सहायक असताना नोकरीला लावण्यासाठी अनेक बेरोजगारांकडून पैसे उकळल्याचा आरोप करत मारहाण केली आहे. या मारहाण प्रकरणावरुन विरोधकांकडून मुनगंटीवरांना घेरण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या सर्व प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube