Download App

Loksabha Election : कमलनाथांच्या दबावापुढे काँग्रेस झुकली ! मुलाला लोकसभेचे तिकीट; दुसऱ्या यादीत ओबीसींचे वर्चस्व

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Congress Second Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी आणि भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने (Congress) आता दुसरी यादी जाहीर केली आहे. सहा राज्यातील 43 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांचे मुले लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश राखू न शकलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी मध्यंतरी काँग्रेसवर दबावाचे राजकारण खेळले होते. कमलनाथ व त्यांचा मुलगा हा भाजपमध्ये जायच्या तयारीत होते. परंतु काँग्रेसने त्यांची मनधरणी केली आहे. आता त्यांच्या मुलाला लोकसभेचे तिकीट मिळाले आहेत.

अजितदादांना बारामतीत डॅमेज केलं तर, आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून कमलनाथ यांचा मुलगा नकुल हे मैदानात उतरणार आहेत. तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव यालाही तिकीट मिळाले आहे. ते जालौर लोकसभेच्या जागेवरून लढणार आहे. तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव हे जोरहाटमधून लोकसभा लढणार आहे.

काँग्रेसचे ओबीसीचे राजकारण

आसामधील बारा, गुजरातमधील सात, मध्य प्रदेशमधील दहा, राजस्थानमधील दहा, उत्तराखंडमधील तीन आणि दमनद्वीपच्या एक उमेदवाराची घोषणा केली आहे. यादीत ओबीसी, एससी आणि एसटी उमेदवार जास्त आहेत. तर एक मुस्लिम उमेदवारही आहे. तेरा ओबीसी, दहा एससी, नऊ एसटी समाजातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत ओबीसींची संख्या जास्त आहे. देशातील ओबीसींची जनगणना करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यामुळे काँग्रेसही आता ओबीसीचे राजकारण करत असून, जास्तीत जास्त ओबीसी उमेदवारांना जागा देत असल्याचे दिसून येत आहे.


वसंत मोरेंचं नाव घेत राऊतांकडून भाजपला नवं नाव; म्हणाले, ‘वॉशिंग मशिनच्या..,’

follow us

वेब स्टोरीज