वसंत मोरेंचं नाव घेत राऊतांकडून भाजपला नवं नाव; म्हणाले, ‘वॉशिंग मशिनच्या..,’
Sanjay Raut On Vasant More : पुणे मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तिखट प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. वसंत मोरे यांनी फक्त वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, हीच इच्छा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Dance Video: 1नंबर दिसतीस साडीत!आलियाने शाहिदसोबत केला कडक डान्स, अदा पाहून व्हाल फिदा
संजय राऊत म्हणाले, वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला त्यावर मी काय मत व्यक्त करू. यावर मोरे यांनीच रामराम का ठोकण्यावर मत व्यक्त केले पाहिजे, ते लोकसभा लढवणार आहे तर कुठून लढणार आहेत? फक्त मोरे यांनी वॉशिंग मशिंगच्या दिशेने जाऊ नये ? एवढीच इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?
तसेच कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासारखे वसंत मोरे हे चांगले कार्यकर्ते आहेत. वसंत मोरेंनी शरद पवार यांची भेट घेणे काही वाईट नाही. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांच्यासोबत भेट घेतली असेल तर त्यातून त्यांनी काहीतरी चांगलं घ्यावं, असा सल्लाही संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना दिला आहे.
माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झालायं…
काही दिवसांपूर्वीच पुण्याचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला होता. यावेळी पुण्यातील मनेसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चुकीचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. त्यावेळी मी वसंत मोरे मनसेचा पुण्यातला पहिला खासदार होऊ शकतो अशी भूमिका मांडली मात्र, पुणे मनसेकडून राजसाहेबांकडे निगेटिव्ह अहवाल पाठण्यात आला. या अहवालात पुण्यात मनसे लोकसभा निवडणूक लढवू शकत नसल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात बोलण्यासाठी मी राजसाहेबांची वेळ मागितली होती पण राजसाहेबही यासंदर्भात काहीही बोलले नाहीत. माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झाला असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र, पुणे मनसेची लोकसभा निवडणूक न लढवण्याबाबतचा अहवाल स्थानिक नेत्यांकडून राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. आपल्यावर राजकारण होत असल्याचा आरोप ठेऊन वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. वसंत मोरे आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे अद्याप अस्पष्ट आहे.