Omraje Nimbalkar Rana Jagjit Singh Patil : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकींच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
कारखान्यांचा मालक बहुरंग सोनावणेला ‘कुणबी’ची गरज का पडली? हातात जातीचा दाखला दाखवत धनुभाऊंनी धुतलं
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज धाराशिवमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करतांना ओमराजे म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा मी समोरच्या उमेदवाराची वाट पाहतो. पण, २० दिवस मला जोड भेटली नाही. सर्व उमेदवारांची-आमदारांची चाचपणी केली, पण उमेदवार काही भेटना. एकही पठ्ठ्या भेटला नाही. आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळानंतर दिवसातून दोनदोन नाव यायला लागली. पण सत्ताधाऱ्यांना उमेदवार भेटत नव्हता. अखेर उमेदवार भेटला आणि आता लढाई सुरू झाली, असा इशारा ओमराजेंनी दिला.
Champions Trophy 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? बीसीसीआय म्हणतो, आमचे संबंध …
पुढं बोलतांना ते म्हणाले, धाराशिव लोकसभा निवडणुकीत एका बाजूला ओमराजे आहे, तर दुसऱ्या बाजूला डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांचं कुटुंब आहे. महाष्ट्राच्या मंत्रिमंडळात शरद पवारांच्या आशिर्वादाने पद्मसिंह पाटील यांनी मंत्री म्हणून कायम पवारांच्या नेतृत्वात काम केलं. त्यानंतर राणा पाटीलही मंत्री झाले. पाटील कुटुंबाने चाळीस वर्ष मंत्रीपद भोगलं. पण त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला काय फायदा झाला? असा सवाल ओमराजेंनी केला.
ते म्हणाले, फायदा एवढाच झाला की, केंद्र सरकारने मागास जिल्ह्याची यादी जाहीर केली, तेव्हा त्या यादीत जिल्हा देशात क्रमांक तीनवर होता. मंत्री म्हणून काम केलेल्या पद्मसिंह पाटलांनी २००९ च्या लोकसभेचा लढवली तेव्हा ते सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत त्यांचा नंबर देशात सर्वात वरचा होता. चाळीस वर्ष सत्ता भोगल्यानंतर पाटील कुटुंबांने पवारांशी गद्दारी केली. राणा पाटील एका रात्रीत कमळाबाईकडे गेले. ज्यांनी मंत्रीपदे दिली, त्यांच्याशी गद्दारी केली, मग ते तुमच्याशी ईमानदारी करतील का? अशी टीका ओमराजेंनी केली.
पाटील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. आता भाजप सोबत जाऊनही जिल्ह्याचा विकास करता आला नाही. त्यामुळं आता पुन्हा विकास करायचं असं सांगून अर्चना पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या. विकास कशाचा तर राणा पाटील कुटुंबाचा विकास… गल्लीत गोंधळ या सिनेमातील मकरंद अनासपुरेंसारखे राणा जगजितसिंह पाटील आहे. ड़ॉ पाटील आणि राणा पाटील यांचा विकास अन मकरंद अनासपुरेंची सोन्याची टोपी यात काही फरक नाही, अशी बोचरी टीका ओमराजेंनी केली.