Download App

सुप्रिया सुळेंचं ‘एक’ मत वाढणार : शरद पवार 10 वर्षांनंतर पुन्हा झाले बारामतीचे मतदार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुन्हा एकदा बारामतीचे (Baramati) मतदार झाले आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुन्हा एकदा बारामतीचे (Baramati) मतदार झाले आहेत. येत्या मंगळवारी (7 मे) माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत ते मतदान करणार आहेत. या निमित्ताने जवळपास 15 वर्षांनंतर पवार पुन्हा एकदा बारामतीमध्ये  मतदान करताना दिसून येणार आहेत. यामुळे त्यांच्या कन्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे ‘एक’ मत वाढणार आहे. (NCP National President Sharad Pawar has once again become a voter of Baramati.)

शरद पवार हे सुरुवातीपासूनच बारामतीच्या ‘रिमांड होम’ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत होते. मात्र 2013 मध्ये त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढविण्यासाठी कायमस्वरुपी पत्ता बदलला होता. ‘भुलाभाई देसाई रोड, मलबार हिल, मुंबई’ असा त्यांनी पत्ता केला होता. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लँडलाइन टेलिफोन बिल, पॅन कार्ड आणि बँक पासबुक असे पुरावे जोडले होते. तेव्हापासून ते मुंबईचे मतदारही झाले होते. 2014, 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांनी मुंबईतच मतदान केले होते.

शेवटच्या क्षणी राणेंना उमेदवारी मात्र विधानसभेत आम्ही … रामदास कदमांचा थेट महायुतीला इशारा

यंदा पवारांनी आपला कायमस्वरुपी पत्ता बारामतीचा दिला आहे. त्यामुळे दहा वर्षांनंतर ते पुन्हा एकदा बारामतीचे मतदार झाले आहेत. मंगळवारी (7 मे) ते माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान करणार आहेत. तर मतदानानंतर ते दिवसभर गोविंदबागेतच थांबणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पवारांनी बारामतीमध्ये मतदान केल्याने अनेकांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो, असेही म्हंटले जाते.

पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? जर सत्य बाहेर…; फडणवीसांचा कोल्हेंना इशारा

राज्यात बारामती लोकसभेची मोठी चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजयांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं पारड जड मानले जात असतानाच शेवटच्या टप्प्यात सुनेत्रा पवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या झंझावाती प्रचाराने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवार पवार कुटुंबातील असल्याने ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

follow us