PM Modi criticize Congress for Terrorist Kasab in Ahmednagar : लोकसभेच्या निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिणचे महायुती आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे ( <strong>Sujay Vikhe ) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांनी अहमदनगर शहरात विराट सभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे ( Congress ) नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar ) यांच्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबचं समर्थन करण्यावरून जोरदार निशाणा साधला.
4 जूननंतर ‘इंडी’वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही; PM मोदींनी विरोधकांची अवस्थाच सांगितली
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी केलेला 26/11 चा हल्ला पाकिस्तानने केला होता. हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच न्यायालयाने देखील याबाबत निर्णय दिला आहे. त्याचे असंख्य पुरावे मिळालेले आहेत. मात्र काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट देत आहे. याच 26/11 च्या हल्ल्यावरील महाराष्ट्रातील एका नेत्याचा विधान अत्यंत गंभीर आहे. ते म्हणाले की, हे सर्व काँग्रेस नेते मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेत आहेत. असं म्हणतच मोदी यांनी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबचं समर्थन करण्यावरून जोरदार निशाणा साधला.
मतपेट्या उघडतील तेव्हा ना पंतप्रधान बदलणार, ना अहिल्यानगरचा खासदार; खा. विखेंना विश्वास
तसेच ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारमध्ये विदेश राज्यमंत्री राहिलेले नेत्यांनी देखील कसाब निर्दोष असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे हा मुंबई हल्ल्यातील मारला गेलेल्या सामान्य निर्दोष नागरिकांचा अपमान आहे. तसेच या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या तसेच जखमी झालेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे देखील हा अपमान आहे.
देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप
त्यामुळे देशाला काँग्रेस कुठे घेऊन जाऊ इच्छित आहे. तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेस पक्ष दररोज खालची पातळी गाठत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कसाबचा समर्थन करणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात एक देखील जागा मिळता कामा नये. असं म्हणत मोदी यांनी कॉंग्रेससह इंडिया आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
महायुतीमध्ये भाजपकडून उत्तर-मध्य मुंबईमध्ये ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यावरून काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. उज्वल निकम हे 26/11 च्या हल्ल्यातील सरकारी वकील होते. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या दहशतवादी अजमल कसाब याने केली नाही. तर ती आरएसएसशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याची वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचा बचाव उज्वल निकम यांच्याकडून करण्यात आला. असेही वडेट्टीवार म्हणाले होते.