4 जूननंतर ‘इंडी’वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही; मोदींनी विरोधकांची अवस्थाच सांगितली

4 जूननंतर ‘इंडी’वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही; मोदींनी विरोधकांची अवस्थाच सांगितली

Pm Narendra Modi : 4 जूननंतर ‘इंडी’वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी निवडणुकीनंतरची इंडिया आघाडीची (India Alliance) अवस्थाच सांगितली आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात आज लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर दुसरीकडे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील (Ahmednagar Loksabha) महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या (Sujay Vikhe) प्रचारार्थ जाहीर सभेला मोदींनी हजेरी लावली. यावेळी आयोजित सभेत मोदी बोलत होते.

मोठी बातमी : निवडणुकांच्या धामधुमीत केजरीवालांना दिलासा नाहीच; जामीनाबाबत दोन दिवसांनी पुन्हा सुनावणी

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात भाजपला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट ठरलीयं. 4 जूननंतर इंडिवाल्यांचा झेंडा उचलणाराही कोणी दिसणार नाही. निवडणुकीआधी भानुमतीचा खेळ सुरु होता, हा खेळ 4 जूनला वाळूसारखा विखुरला जाणार आहे. ही निवडणूक संतुष्टीकरण आणि तुष्टीकरणामध्ये होत आहे. इंडिया आघाडी आपल्या रणनीतीच्या तुष्टीकरणाचे प्रयत्न करीत असून काँग्रेस आता पूर्णपणे मुस्लिम लीग झाली असल्याचा घणाघात मोदींनी काँग्रेसवर केलायं.

तसेच या निवडणुकीतील भाजपचे मुद्दे पाहा अन् काँग्रेसचे पाहा…विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, सन्मान, हे भाजपचे मुद्दे आहेत, काँग्रेस यातील एकाही मुद्द्यावर बोलण्याच्या परिस्थितीत आहे काय? गरीब कल्याणची चर्चा झाली तर काँग्रेस लपून बसते त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही. काँग्रेसने 50 वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासने दिली, जनतेचा त्यांनी मोठा विश्वासघात केला, असल्याचाही हल्लाबोल मोदींनी केलायं.

‘त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालाय’; पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर

‘इंडिया आघाडी संपूर्ण आरक्षण मुस्लिमांना देणार’, मोदींचा आरोप
बिहारमध्ये इंडिया आघाडीचे मोठे नेते आत्ताच जेलमधून बाहेर आले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावलीयं. जेलमधून बाहेर येताच त्यांनी बिहारमध्ये संपूर्ण आरक्षण मुस्लिमांना देणार असल्याची घोषणा माध्यमांसमोर केलीयं. देशातील गोरगरीब जनतेचं, एससी, एसटी समाजाचं आरक्षण हिसकावून घेत काँग्रेस आणि इंडिया आघाडी मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस तोंडावर पट्टीच बांधणार, विकासकामांचा दाखल देत मोदींची टीका
देशातील गोरगरीब जनतेला भाजप सरकारने 4 कोटी घरे दिली आहेत. जनतेला जनधन खात्यात 50 कोटी घरांना लाभ दिला आहे. आम्ही मोफत राशन दिल्याचा हिशोब देणार आहोत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे 3 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असल्याचं आम्ही सांगणार पण काँग्रेस काय करणार? कॉंग्रेस आपल्या तोंडावर पट्टी बांधणार असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube