विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, डब्बे नाहीत; फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इंडिया आघाडीवर (India Alliance) घणाघाती टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, डब्बे नाहीत, असं फडणवीस म्हणाले.
विजयबापूंनी दाखवली मैत्री! तीन तालुक्यांचा बडा नेता शिवसेनेत; सुनेत्राताईंच्या विजयासाठी फिल्डिंग
फडणवीस म्हणाले, ही निवडणुक ग्रामपंचायची निवडणूक नाही. तर देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात देश द्यायया हे ठरवारी निवडणूक आहे. आज मोदींच्या नेतृत्वात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) आणि इतरही घटक पक्ष आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, आपली विकासाची गाडी आहे. विकासाच्या गाडीला मोदींच इंजिन आहे. त्या इंजिनाला प्रत्येक पक्षाचा डब्बा लागला आहे. त्या डब्यात शेतकरी, मजूर, ओबीसी, अल्पसंख्यांक अशा प्रत्येक माणसाला बसायला जागा आहे. तिकडे मात्र, डबेच नाहीत. फक्त इंजिन आहे, अशी टीका फडणवीसांनी केला.
कपिल शर्माने गमावली ‘या’ सिनेमात काम करण्याची संधी; म्हणाला, ‘रात्रभर रडलो पण…’
फडणवीस म्हणाले, राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे. प्रत्येकजण हे इंजिन ओढत आहे. त्यामुळं त्यांचं इंजिन पुढं जात नाही. ते ठप्प पडलेलं इंजिन आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
इंजिनमध्ये फार फार ड्रायव्हर बसू शकतो आणि ड्रायव्हरचा परिवार बसू शकतो. त्यांच्या इंजिनमध्ये तुम्हाला जागा नाही, असंही फडणवीस म्हणाले.
संजयकांकाची हॅट्रीक पक्की
संजयकाका पाटील यांचा विजय पक्का आहे. आता ते किती मोठ्या मताधिक्याने विजयी होतात, हे बघायचं आहे. संजय काका मोदींच्या इंजिनच्या डब्यात सर्वांना दिल्लीला घेऊन जात आहेत, असं फडणवीस म्हणाले.