‘ते ताकदवान झाले तर देशाचे तुकडे करतील’; मोदींची इंडिया आघाडीवर घणाघाती टीका
Narendra Modi Nagpur speech : दोन दिवसांपूर्वी लोकसभा निडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोडला. त्यांनी चंद्रपुरात सुधीर मुंनगटीवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. तर आज त्यांनी रामटेकमध्ये राजू पारवेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीवाले (India Alliance) गरीबांना कधीच पुढे जाऊ देणार नाहीत, ते सनातन धर्मावर फक्त टीका करतात, अशी टीका मोदींनी केली.
सांगलीसाठी विश्वजीत कदमांचा ‘ICE & Sugar’ गेम; विशाल पाटलांचीही बाजूला बसत खंबीर साथ…
सभेला संबोधित करतांना मोदी म्हणाले की, 19 आणि 26 तारखेला आपल्याला केवळ मतदान करायचे नाही तर विकसित भारताच्या मजुबुतीसाठी मतदान करायचे आहे.
मीडियावाले सध्या सर्वेक्षण करत आहेत. पण त्यांनी सर्वे करायची गरज नाही. कारण त्यांनी मी सांगतो तसा अंदाज लावला पाहिजे. जेव्हा विरोधक मला किंवा माझ्या आई-वडिलांना शिव्या देतात तेव्हा नक्क समजून घ्या की पुन्हा मोदी सरकार येणार आहे, असं मोदी म्हणाले.
इंडिया आघाडीचे नेते संस्कृतीवर हल्ला करतात
विरोधकांवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीवाले गरिबांना कधीच पुढं जाऊ देणार नाहीत. इंडिया आघाडीवाले ताकतवर झाले तर ते देशाचे तुकडे करतील, आजही हे लोक भारताच्या संस्कृतीवर हल्ला करण्याचे काम करत आहेत. इंडिया आघाडीचे नेते समाजात दुही माजवण्याचे काम करतात, अशी टीका मोदींनी केली.
रामटेक, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला या वर्षी रामनवमी भव्य मंदिरात होत असल्याचा आनंद होत आहे. इंडिया आघाडीच्या या नेत्यांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. पण, हे सनातन धर्म नष्ट करायला निघाले. अशा लोकांना तुम्ही त्यांची चुकांची शिक्षा देणार आहात की नाही? असा सवाल मोदींनी केला.
विरोधकांकडे टीका करायला मुद्दे नाहीत….
इंडिया आघाडीचे लोक काहीही खोटं बोलत आहेत. मोदी सत्तेत आले तर संविधान आणि लोकशाही धोक्यात येईल, असं ते सांगतात. मी जेव्हापासून राजकारणात आलो, तेव्हापासून ते हेच सांगत आहे. हीच जुनी पुराणी कॅसेट चालवत आहेत. यांच्याकडे दुसरे टीका करायलाही मुद्दे नाही. इमर्जन्सीच्या काळात लोकशाही धोक्यात कॉंग्रेसने आणली होती. आता एक गरीबाचा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो तर यांना संविधान धोक्यात येईल, असं वाटतं. देशातील लोक एकजुट झाले तर इंडिया आघाडीची राजनीती संपून जाईल. मी महाराष्ट्रातील लोकाना एकजुट होऊन देशाच्या नावावर मतदान करण्याचं आव्हान करतो, असंही मोदी म्हणाले.
संविधान तोडण्याचे काम काँग्रेसने केलं – गडकरी
400 जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू, असा अपप्रचार काँग्रेस करत आहे. काँग्रेसवाल्यांनीच मुळात संविधान मोडण्याचे काम केले आहे. मोदीजींचा निर्धार सबका साथ-सबका विकास आहे. जे काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही ते मोदींच्या 10 वर्षात झाले. महाराष्ट्र सरकार आणि केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. देशात परिस्थिती बदलत आहे.