Download App

काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या प्रचारात दिसेल; पाटा खालून पाणी वाहून गेल्यानंतरही राऊत आशावादी

  • Written By: Last Updated:

सांगली : सांगलीच्या जागेवरून मविआत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच काही केल्या थांबण्यास तयार नसून, सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वस्वी प्रयत्न केले जात असतानाच येत्या दोन दिवसांत सांगलीतील चित्र बदलेल आणि चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेत काँग्रेस आलेली दिसेल असा आशावाद संजय राऊतांनी (Sanjay Raut) व्यक्त केला आहे. विशाल पाटलांसह काँग्रेसचे नेते सांगलीच्या जागेवरून हट्टाला पेटलेले असताना आणि पाटा खालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतरही राऊतांनी हा आशावाद बोलून दाखवला आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. (Sanjay Raut On Sangli Loksabha Seat Controversy )

सांगलीसाठी ठाकरेंचं ‘मनपरिवर्तन’ करणार काँग्रेसचा हुकमी एक्का; उत्तर मुंबईसाठीदेखील खास प्लॅन

राऊत म्हणाले की, विशाल पाटील काही आमचे शत्रू नाहीत. त्यांच्या मनात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रेम आहे. चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगलीतील वातावरण तुम्ही सर्वांनी पाहिले. अर्ज भरताना आघाडीमधील सर्व नेते उपस्थित होते. विश्वजीत कदम यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, दोन दिवसात काँग्रेस चंद्रहार पाटलांसाठी मैदानात उतरेल. तसेच पुढच्या सभेला विश्वजित कदम हे देखील मंचावर दिसतील असे संजय राऊत म्हणाले. विशाल पाटलांशी आमचा यावेळेला उत्तम संवाद असल्याचेही ते म्हणाले.

पवारांच्या बाहेरच्या सुनेला खासदार करण्यासाठी मोदी येणार पुण्यात; स.प मैदानावर 29 एप्रिलला जंगी सभा

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर, पवारही पाठिंबा देतील

पुढे बोलताना राऊतांनी ठाकरेंच्या पंतप्रधानपदाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना पंदप्रधान होण्याची संधी मिळाली तर, स्वतः शरद पवारदेखील मैदानात उतरून पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही. आमच्या PM पदासाठी अनेक चेहरे असून, फक्त मोदी एके मोदी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल असेही राऊत म्हणाले.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अधिक मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही असा दावादेखील राऊतांनी यावेळी बोलताना केला.

follow us