विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांना टोकाचा निर्णय घ्यावाचं लागणार; सांगलीसाठी ठाम का? राऊतांनी सांगितलं कारण…

  • Written By: Published:
विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांना टोकाचा निर्णय घ्यावाचं लागणार; सांगलीसाठी ठाम का? राऊतांनी सांगितलं कारण…

मुंबई : सांगलीच्या जागेवरून काँग्रसे आणि ठाकरे गटात धुसफूस सुरू असून, विश्नजीत कदमांनी सांगलीच्या जागेवरून मविआने फेरविचार व्हावा अशी विनंती काल (दि.10) पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र, विश्वजीत कदमांच्या या मागणीनंतरही ठाकरे गट सांगलीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे याची फोड संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. राऊतांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गट सांगली सोडण्यास काही केल्या तयार नसल्याचे चित्र असून, आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, ठाकरेंनी सांगलीतून माघार न घेतल्यास विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. (Sanjay Raut On Sangali Loksabha Seat)

नाराजीची धग सांगली मार्गे मुंबई; जागावाटपात काँग्रेसच्या कठोर भूमिकेची गरज होती : वर्षा गायकवाड

राऊत म्हणाले की, प्रत्यक्ष सांगलीमध्ये विधानसभेसाठी संघाचा माणूस निवडून येत असून, मिरजेमध्ये संघाच माणूस निडणून येतो तेथे दंगली घडवल्या जातात असा गंभीर दावाही राऊतांनी यावेळी बोलताना केला. विश्वजीत कदम असतील, विशाल पाटील असतील त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो असे म्हणत ते काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्ष सांगलीत ते काम करत असल्याचेही राऊतांनी यावेळी मान्य केले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे. प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो आणि दंगली घडवल्या जातात, हे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना देखील माहित आहे. त्यामुळे या घटनांना आणि भाजपसोबत टक्कर घ्यायची असेल तर, सांगतील शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं असल्याची जनभावना असल्याचे राऊत म्हणाले.आज परिस्थिती अशी आहे की, यांच्याशी मुकाबला करायचा असेल, शक्तींशी मुकाबला करायचा असेल तर तिकडे शिवसेना हवी असेही राऊतांनी ठणकावून सांगितले. यावेळी ठाकरे गटाकडून सांगलीचे उमेदवार असलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

सांगली लोकसभा मतदारसंघ ;काँग्रेसकडेच; ठेवण्यासाठी विश्वजीत कदमांचा प्लॅन; ठाकरे काय करणार?

पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते विश्वजीत कदम

सांगलीत काल (दि.10) विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यात विश्वजीत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार असल्याचे अगदी शांतपणे सांगितले. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी यावेळी कदम यांनी केली. एकीकडे विश्वजीत त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवत होते तर, ज्या विशाल पाटलांसाठी विश्वजीत यांनी शड्डू ठोकला आहे त्यांच्या बाजूला एक शब्दही न बोलता विशाल पाटील अगदी खंबीरपणे साथ देत असल्याचे पाहण्यास मिळाले.

स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी आणीबाणीतही इथून काँग्रेसचा विजय झाला होता. त्यामुले जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवण्यासाठी सक्षम आहे. पण याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी या जागेवर दावा केला. त्यांनी चंद्रहार पाटील यांची अचानक उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. पण आम्ही अगदी दिल्लीपासून राज्यात प्रयत्न केले आहेत. यानंतरही या जागेसाठी आम्ही प्रयत्न करत राहु. पक्षश्रेष्ठींनी या जागेबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कमळामुळे नव्हे तर, धनुष्यबाणामुळे लागला राज ठाकरेंच्या ‘इंजिन’ला ब्रेक!

वाद न वाढवता पवार, ठाकरेंना दिला मान

सांगलीच्या जागेवरून एकीकडे राऊत दररोज आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. राऊतांच्या भूमिकेला विश्वजीत कदम रोखठोक प्रत्त्युत्तर देतील अशी आशा होती. पण तसे झालेच नाही. उलट विश्वजीत कदमांनी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव घेत त्यांना आदरणीय असे संबोधले. एवढेच नव्हे तर, विश्वजीत यांनी उद्धव ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे सांगलीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर ज्या आक्रमक भूमिकेत विश्वजीत दिसून आले होते. ते बघता आज ते टोकाचा निर्णय जाहीर करतील असे वाटत होते. पण, त्यांनी आक्रमक न होता पवार आणि ठाकरेंसाठी मानाचे शब्द उच्चारत वाद विकोपाला नेण्याऐवजी तो गोड बोलून आणि शांत डोक्याने सोडवण्याकडे भर देत असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मात्र, सांगलीसाठी आगर्ही असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. आता या सगळ्या वादात उद्धव ठाकरे मोठ्या मनाने एक पाऊल मागे घेतात की तेही ठाम राहतात हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज