विशाल पाटील लढले तर पाठिंबा देऊ…; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं!

विशाल पाटील लढले तर पाठिंबा देऊ…; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं!

Prakash Ambedkar on Sangali Loksabha : सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) नाराज आहेत. ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याचे सांगून त्यांनी या जागेवर शड्डू ठोकला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडक (Prakash Ambedkar) यांनी मोठं विधान केलं.

दात पडलेला अन् नखं वाढलेला शक्तीहीन वाघ; पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका 

विशाल पाटील हे सांगलीत रिंगणात उतरल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असं आंबडेकरांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकर यांची आज नागपूरच्या उमरेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी सांगली लोकसभा जागेवर भाष्य केले. या सभेत ते म्हणाले की, प्रतीक पाटील चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते आणि काय करायचे ते विचारत होते. मी त्यांना म्हणालो, हिंमत असेल तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडून आणू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडीवरही टीका
राहुल गांधींनी मॅच फिक्सिंग हा शब्द वापरला. दुर्दैवाने महाविकास आघाडीने तो शब्द प्रत्यक्षात उतरवला, असं मी मानतो. कारण, नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर झाली. पण त्यांनी लढण्यास नकार दिला. नांदेडमधील उमेदवार आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवर असतो. तो प्रचार करेल की, तब्येतीची काळजी घेईल. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार दिला. पण, एकनाथ शिंदे यांच्या मुलाविरोधात तो उमेदवार लढूच शकत नाही, असं कल्याणचे लोक सांगत आहेत. याचा अर्थ काय ? असा सवाल आंबेडकरांनी केला.

दरम्यन, आंबेडकरांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रहार पाटील यांना आधीच भाजपचे संजय काका पाटील यांचे कडवे आव्हान आहे. शिवाय सांगलीत ठाकरे गटाची स्वतःची फारशी ताकद नाही. तिथं बहुतांश आमदार काँग्रेस आणि शरद पवार गटाचे आहेत. अशा परिस्थितीत विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तर चंद्रहार पाटील यांना सांगलीतून निवडून येणे फार कठीण जाणार आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज