Sanjay Kakade On BJPS Set Back in Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यात महायुती (Mahayuti) आणि भाजपचा धुव्वा उडाला आहे. देशात देखील यंदाची लोकसभा निवडणूक भाजपाला धक्का देणारी ठरली. निवडणुकीत अनेक दिग्गजांना जनतेनं आस्मान दाखवलं. ज्या राज्यांत भाजप क्लीन स्वीप करील त्याच राज्यांनी यंदा भाजपाची फिरकी घेतली. त्यावर मुलाखत देताना पुण्यातील भाजपचे नेते संजय काकडे ( Sanjay Kakade ) यांनी या पराभवाची कारणमीसांसा केली. यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर देत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या खासदारावर जोरदार टीका केली. ते लेट्सअप मराठीला दिसलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
निवडणुकीचा वाद टोकाला ! लंके समर्थक राहुल झावरेंसह 24 जणांविरुद्ध विनयभंग, अॅट्रासिटीचा गुन्हा
यावेळी बोलताना संजय काकडे म्हणाले की, 2019 च्या तुलनेत 2024 ला आमचे 15% खासदार कमी झाले. याचं कारण म्हणजे आमच्या पक्षाचे एक दोन लोक विशेषतः एक खासदार संविधानाबाबत काही बरळला. त्याने संविधान बदलण्याची भाषा केली. हे त्याचे स्वतःचे वैयक्तिक मत होतं. मात्र विरोधकांनी त्यावरच आम्हाला टार्गेट केलं.
मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत
त्यामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये भाजपाला फटका बसला. कारण या राज्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि यांच्या संविधानाला मानणारा वर्ग मोठा होता. याचे सर्वात जास्त फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला. तसेच जनतेला आम्ही संविधान बदलण्याची कुठलीही भूमिका भाजपची नाही हे पटवून देण्यात कमी पडलो. त्यामुळे भाजपाला हे अपयश आलं. असं म्हणत काकडे यांनी भाजपच्या लोकसभेत जी काही मोठी पिछेहाट झाली आहे. त्याची कारणमीमांसा केली आहे.
तसेच यावेळी मोहोळांना तिकीट दिल्याने संजय काकडे ( Sanjay Kakade ) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्यांनी मोहोळांच्या प्रचाराचं काम व्यवस्थित केलं नाही. असंही बोललं गेलं काकडे यांनी त्यावर मला मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. असं म्हणत त्यांना खोचक टोला लगावला आहे.