Sanjay Kakade : फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काकडेंचे गणपतीला साकडे!

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 09 27T123159.239

मुंबई :  राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता काकडे यांनी फडणवीसांचे मुंबई येथील शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाऊन बाप्पांचे दर्शन घेत साकडे घातले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्ध ठेव असे साकडे काकडे यांनी श्री गणरायाच्या चरणी घातले आहे. (Sanjay Kakade Visits Devendra Fadnavis Sagar Banglow )

12 षटकार अन् 8 चौकार सर्वाद जलद शतक ठोकत नेपाळच्या पठ्ठ्याने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम

गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) अनेक मान्यवर दिग्गज नेते आणि सेलिब्रिटींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी गणपतीची आरती केली आणि आरतीनंतर बाप्पाचे दर्शन घेतले. सर्व जनतेच्या कल्याणाकरिता त्यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे यासोबतच महाराष्ट्राची भरभराट होऊ दे अशी प्रार्थना माजी खासदार संजय काकडे यांनी श्री गणरायाच्या चरणी केली.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, काय असणार खास? जाणून घ्या…

माजी खासदार संजय काकडे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नुकत्याच अमृता फडणवीस येऊन गेल्या होत्या तर, आज संजय काकडे त्यांच्या मुंबईतील घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे यासोबतच महाराष्ट्राची भरभराट होऊ दे अशी प्रार्थना माजी खासदार संजय काकडे यांनी श्री गणरायाच्या चरणी केली.

महाराष्ट्रातील राजकीय तथा विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर पुणे आणि मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेत आहेत. काल पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्यातील काही मंडळांना भेट देत मनोभावे आरती केली.

Tags

follow us