12 षटकार अन् 8 चौकार सर्वाद जलद शतक ठोकत नेपाळच्या पठ्ठ्याने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम

  • Written By: Published:
12 षटकार अन् 8 चौकार सर्वाद जलद शतक ठोकत नेपाळच्या पठ्ठ्याने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम

Nepal Kushal Malla Fastest Century In Asian Games : आशियाई गेम्समध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अनेक विक्रम मोडीत काढले. नेपाळ संघाने अवघ्या 120 चेंडूत 314 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने टी-20 सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 2017 मध्ये इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते, मात्र नेपाळच्या कुशल मल्लने (Kushal Malla)  त्याचा विक्रम मोडीत काढत अवघ्या 34 चेंडूत शतक पूर्ण केले आहे.

नको नको ढाब्यावर जाऊ…बावनकुळेंचं निमंत्रण हेरंब कुलकर्णी यांनी स्वीकारलं

बुधवारी (दि.27) मंगोलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नेपाळच्या संघाने 20 षटकांत तीन गडी गमावून 314 धावा केल्या. टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याच सामन्यात नेपाळचा फलंदाज कुशल मल्ला याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रमही मोडून काढला.

Asian Games : भारतासाठी ‘सुवर्ण’ दिन; तब्बल 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत मिळवलं ‘गोल्ड’ मेडल

कुशल मल्लाने T20 मध्ये सर्वात जलद शतक ठोकले आहे. त्याने मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रोहितने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक पूर्ण केले होते. कुशल मल्लने 50 चेंडूत 12 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 137 धावांची नाबाद खेळी केली.

याआधी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम रोहित आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर यांच्या नावावर होता. मिलरने 29 ऑक्टोबर 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शतक केले होते, तर रोहितने दोन महिन्यांनंतर 22 डिसेंबरला तेच केले होते. कुशल मल्लाचे हे टी-20 मधील पहिले शतक आहे. याआधी, त्याने टी-20 चे 15 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते, परंतु एकाही सामन्यात त्याला शतक करता आले नाही.

Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नमंडपात मृत्यूचं तांडव; 100 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी

मल्लशिवाय नेपाळच्या दीपेंद्र सिंग ऐरीनेही मोठा पराक्रम केला. त्याने केवळ 9 चेंडूत T20 मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. दीपेंद्रने पहिल्या 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. दीपेंद्रने 10 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात त्याने 8 षटकार मारले. दीपेंद्र सिंगच्या या खेळीमुळे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडीत निघाला. युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube