Download App

वंचितने उमेदवारी देताच रमेश बारसकरांवर मोठी कारवाई! शरद पवार गटाकडून हकालपट्टी

  • Written By: Last Updated:

Ramesh Baraskar Dismised : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल 11 आगामी लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत वंचितने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस रमेश बारसकर (Ramesh Baraskar) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं आता शरद पवार गटाने बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

महायुतीचे जागावापट अजूनही रखडले, ४ जागांचा तिढा सोडवण्यासाठी पहाटे ३ वाजेपर्यंत बैठका 

अजित पवार यांचा राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाने केला. ही बाब लक्षात घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

Rain Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट 

रमेश बारस्कर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुतांश नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र, रमेश बारस्कर हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, आठ दिवसांपूर्वी रमेश बारस्कर यांना शरद पवार गटातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.

दरम्यान, ओबीसी महासंघाने माढ्यात आयोजित केलेल्या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांची याच कामगिरीची दखल घेऊन वंचितने त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून संधी दिली आहे. त्यानंतर आता बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना राष्ट्रवादीने वंचितचा किंवा अन्य कोणत्याही वंचित नेत्याचा उल्लेख केलेला नाही.

follow us