Download App

…तेव्हा निकालाआधीच आमचा भाजपला पाठिंबा होता; सुनिल तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Sunil Tatkare : 2014 साली निवडणुकीच्या निकालाआधीच राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा होता, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल

Sunil Tatkare : 2014 साली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच राष्ट्रवादीचा (NCP) भाजपला (BJP) पाठिंबा होता, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलायं. दरम्यान, राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात (Pune) झालेल्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे म्हणाले, आज राष्ट्रवादी काँगेसवर विरोधक टीका करत आहे की, आम्ही भाजपबरोबर सत्तेसाठी गेलो मात्र आम्ही 2014 निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच आधी भाजपला पाठिंबा देणार होतो, दादांना सांगण्यात आल् होत की तू भाजपा बरोबर जा, त्यानुसार दिल्लीत बैठक झाली त्या बैठकीत अमित शहा यांनी सांगितलं की शिवसेना आमचा जुना पार्टनर आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही. असा मोठा खुलासा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.

सुनील तटकरे पुढे म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाचे स्पष्ट म्हणणं होत की 2016 मध्ये जर राष्ट्रवादी येणार असेल तर स्वागतच पण शिवसेना आमच्याबरोबर राहणार. 2017 मध्ये भाजपबरोबर जाण्यास आम्ही तयार होतो पण आम्हाला शिवसेना नको होती असं सुनील तटकरे म्हणाले. त्यामूळे आमची भूमिका ही अचानक बदलेली नाही.

तर बारामती लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले, बारामती लोकसभा निवडणुकीवेळी माझी ही निवडणूक होती, त्यामुळे मी इकडे आलो नाही, बारामतीसाठी दादा स्वतः सक्षम आहेत. या भागात त्यांनीच यापूर्वीच्या निवडणूक जिंकून दिले आहे. त्यांना या मतदारसंघाचा चांगला अभ्यास आहे. बारामतीत पवारांची सत्ता येणार आहे. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार नव्हती ही निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी होती असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंना टोला लावला.

Air India Express Strike : … म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा

राज्यात पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महायुतीच आघाडीवरती राहिली आहे. महायुतीला पाठिंबा मिळत असून महायुतीला 45 जागा मिळतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा

follow us

वेब स्टोरीज