Uddhav Thackeray On Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली. मोदींवर बाळासाहेब ठाकरेंच कर्ज आहे, असं ते म्हणतात. मग त्यांच्याच खोलीत अमित शाहांनी दिलेलं वचन का मोडलं? असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरेंनी केला. नुसत बाळासाहेब म्हणू नका, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरते का, असाही सवाल ठाकरेंनी केला.
सर्कस पाहून करिअरची निवड केली, निलेश साबळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
महाविकास आघाडीची आज धाराशिवमध्ये सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. ते आज तुम्ही सांगता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. 2014 मध्ये मी इथे तुळजाभवानीचा आशिर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यावर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला आणि त्यांनी सांगिलतं की, वरून आदेश आहे की, शिवसेना आणि भाजपने युती मोडायची, तेव्हा मोदींना माहिती नव्हतं का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
…तेव्हा कोकणात यांच्यासारखे दलाल फिरत नव्हते; राज यांचा उद्धव ठाकरे, विनायक राऊतांवर निशाणा
बाळासाहेबांचं मोठं कर्ज आहे, असं मोदीजी तुम्ही मानता. एकतर त्यांना बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणा, ते हिंदुहृदयसम्राट आहेत. हिंदुहृदयसम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदूहृदयसम्राटांचं तुमच्यावर कर्ज आहे, हे तुम्हाला माहिती आहे, तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीत त्यांनी अमित शहांना दिलेले वचन मोडलं, हे तुम्हाला माहीत नव्हते का? आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंवर काही संकट आले तर मी धावून जाईल. पंतप्रधान मोदींवरही संकट आलं तर मी देखील धावून जाईल. फक्त तुम्ही महाराष्ट्र आणि देशावर संकट म्हणून आलात, त्यावर आवर घाला, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला.
अमित शहा, तुम्ही काल मला काही मुद्द्यांवर बोलण्याचे आव्हान दिलं. मी सर्व मुद्द्यांवर बोलण्यास तयार आहे. जर तुमच्यात थोडी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला. मराठवाड्याला पाणी कधी देणार? केंद्र सरकारने दहा वर्षांत मराठवाड्याला काय दिले? ईडी, सीबीआय यांचे घरगडी आहे. मात्र 4 जूननंतर हे सर्व घरगडी आपल्याकडे येणार आहे. शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या ईडी आणि सीबीआयलाही पाहून घेऊ, असा इशारा ठाकरेंनी दिला.