तुम्हाला जर कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल तर …. शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
Sharad Pawar On Narendra Modi : आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) व प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे.
या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये सत्ता लोकांसाठी चालवली पाहिजे, आज देशात हिंसा होत आहे मात्र मोदी भाषण देत आहे. ते पंडित नेहरू, राजीव गांधी , राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहे. पंडित नेहरू यांनी देशात स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्ष तुरंगात घालवली आणि स्वातंत्र्यानंतर अनेक विकास कामे करून देशाला पुढे नेण्याचे काम पंडित नेहरू यांनी केला आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करतात अशी घणाघात टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली. तुम्हाला जर कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल तुम्ही त्यांच्याबद्दल वाईटही बोलू नका असा टोला त्यांनी या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांना लावला.
राहुल गांधी देशातील समस्या समजण्यासाठी जुम्म काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालले तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करतात. आज सत्ताधारी भाजप या देशाला हुकूमशाही पद्धतीने चालवत आहे.
उमेदवारांपेक्षा जास्त मत NOTA मिळाली तर काय होणार ? निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
लोकशाही पद्धतीने निवडून येणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारण नसतानाही तुम्ही त्यांना तुरुंगात ठेवले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केली तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकले, जे तुमच्या विरुद्ध बोलणार तुम्ही त्यांना तुरुंगात टाकणार का ? असा सवाल त्यांनी नरेंद्र मोदींना विचारला.