गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही; पटोलेंचे CM शिंदेंवर टीकास्त्र
Nana Patole on CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकतंच एका प्रचार सभेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी गरम झाले की, परदेशात जातात, असं शिंदे म्हणाले होते. त्यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) जोरदार प्रत्युत्तर दिलं. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असं पटोले म्हणाले.
Naseem Khan Resign : काँग्रेसला पुन्हा धक्का; नसीम खान यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा
आज नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, भाजप आणि मित्रपक्षांची घाबरगुंडी झाली आहे. पराभवाच्या भीतीने ते धास्तावले असून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या मेहरबानीमुळं झालेले झालेले मुख्यमंत्री आहेत. भाजप जेवढी चावी देते, तेवढेच ते बोलू शकतात, अशी टीका पटोलेंनी केली.
Lok Sabha elections : राज्यात मतदानाचा टक्का घटला! फटका कुणाला बसणार?
पटोले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना मर्यादा ओलांडू नये. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानं त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसल्या जाणार नाही, अशी पटोलेंनी केली.
पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी पदयात्रा काढून संपूर्ण भारत पिंजून काडला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4 हजार किलोमीटरची पदयात्रा काढली. सर्व समाजाच्या लोकांच्या वेदना जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मणिपूर ते मुंबई अशी 6700 किमीची भारत जोडो न्याय यात्रा काढली. राहुल गांधींनी ऊन, वारा, पाऊस याची तमा बाळगली नाही. ते सतत चालत राहिले, ते केवळ देशातील जनतेसाठीच. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी गरम झाले की, परदेशात जातात, असं बाष्कळ विधान करून अकेलेचे तारे तोडले. गद्दारी करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या मिध्यांना गांधी कुटुंबांचा त्याग, बलिदान व राहुल गांधी काय कळणार, असा सवाल त्यांनी केला.