Download App

तुनिषा शर्माच्या मृत्यूचे कारण आले समोर; जाणून घ्या

  • Written By: Last Updated:

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू हा श्वास कोंडल्याने झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून झाला आहे. फास लागल्याने तुनिषाचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुनिषाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयात करण्यात आलं.

दरम्यान अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणी तिचा सहकारी कलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या शिझान मोहम्मद खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिझानला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शिझानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली होती. तुनिषाच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत. तिची काकू परदेशात राहत असल्याने तिला यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार उद्या किंवा परवा होतील.

Tags

follow us