पुण्यात धक्कादायक प्रकार, परीक्षेपूर्वीच दहावीचा गणित पेपर ‘टेलिग्राम’वर व्हायरल; गुन्हा दाखल

SSC Exam 2026 : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु असून राज्य शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

SSC Exam 2026

SSC Exam 2026

SSC Exam 2026 : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु असून राज्य शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार, पुण्यात दहावीच्या (SSC Exam 2026) गणिताचे दोन्ही पेपर परीक्षा होण्यापूर्वीच ‘टेलिग्राम’ ग्रुपवर फिरल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडियावर  गणित भाग-1 आणि भाग-2 या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या काही दिवस आधीच व्हायरल झाल्याने या प्रकरणात पुणे विभागीय शिक्षण मंडळाने (State Board of Education) तातडीने पोलिसांकडे धाव घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

मोठी बातमी! कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद-

ग्रुपवर फिरलेले पेपर (10th class math paper) आणि प्रत्यक्ष परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले पेपर जवळपास सारखेच असल्याचे लक्षात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी संबंधित टेलिग्राम (Telegram) ग्रुपचा अ‍ॅडमिन आणि सदस्यांवर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे. तर दुसरीकडे नेमकं हे पेपर ग्रुपवर कोणी टाकले आणि ते बाहेर कसे आले याचा तपास आता पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

IPL 2026 पहिलाच सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ? आरसीबी भिडणार ‘या’ संघाशी  –

Exit mobile version