Download App

मोठी बातमी! राज्यातील तब्बल 14 ITI चे नामांतर होणार, जाणून घ्या नवीन नावे

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting

  • Written By: Last Updated:

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने तब्बल 14 आयटीआय महाविद्यालयाचे (ITI College) नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बैठकीत सरकारने सरपंच आणि उप सरपंच यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता 14 आयटीआय महाविद्यालयांना महापुरुषांचे आणि संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्यात येणार आहे. सरकारने या 14 आयटीआयसाठी 14 महान व्यक्तींची नावेदेखील दिले आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला आता धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे नाव देण्यात आले तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं नाव देण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे.

नेमकं कुठल्या आयटीआयला कुणाचं नाव?

सध्याचे नाव –                                                                              नव्याने करावयाचे नामकरण

1. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

2. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक :  महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था

3. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे : धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था

4. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड : कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

5. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

6. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर : भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था

7. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था

8. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था

9. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती : संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

10. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा : दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

11. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव : कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

12. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव : आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

13. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई. : दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेपूर्वी सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात होणार वाढ

14. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. : महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

 

follow us