सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेपूर्वी सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात होणार वाढ

  • Written By: Published:
सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेपूर्वी सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात होणार वाढ

Girish Mahajan : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माहिती दिली. तसेच ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदांबाबतही राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील सरपंच (Sarpanch) व उपसरपंच (Deputy Sarpanch) यांच्या मानधनात दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं विलीन करुन हे एकच पद करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे.

याच बरोबर ज्या ग्रामपंचायतींचं वार्षिक उत्पन्न 75 हजार आहे, त्यांना 10 लाखांपर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्यात आली असल्याची माहिती देखील यावेळी गिरीश महाजन यांनी दिली.

तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे. या महाविद्यालयांना आता 14 महान व्यक्तींची नावे देण्यात आली आहे.

 

आमदार राजळे यांच्या विकास कामांची काकडेंनी केली पोलखोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube