आमदार राजळे यांच्या विकास कामांची काकडेंनी केली पोलखोल
Shivajirao Kakade : येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहे त्यापूर्वीच आता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचा डंका पिटविला जात आहे. शेवगाव- पाथर्डीचे विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी विकास काम केले असल्याचे ते वारंवार सांगतात मात्र त्यांच्याच विकास कामांची जनशक्ती विकास आघाडीचे (Jan Shakti Vikas Aghadi) एडवोकेट शिवाजीराव काकडे (Shivajirao Kakade) यांनी पोलखोल केले आहे.
एकीकडे लोकप्रतिनिधींकडून विकास कामाचा डंका पेटावीला जात आहे मात्र दुसरीकडे आजही मतदारसंघातील वाड्या वस्तीवरील लोकांना रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा देखील पोहोच होत नाहीत. गेल्या दहा वर्षात केवळ लोकप्रतिनिधींनी नागरिकांची फसवणूक करत केवळ फसव्या विकासाचा बोलबाला केला आहे अशा कडव्या शब्दात आमदार राजळे यांचा नाम उल्लेख टाळत काकडे यांनी जोरदार टीका केली.
शेवगाव- पाथर्डी मतदारसंघांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे विद्यमान आमदारांकडून विकासाच्या कामाचा लेखाजोखा मांडत असताना दुसरीकडे मतदारसंघातील वास्तव मात्र वेगळच असल्याचं काकडे सांगत आहेत. शेवगाव तालुक्यातील अनेक गाव वाड्यावर ती आजही मूलभूत सुविधांचा वनवा आहे.
शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथील कळमकर वस्ती व गरड वस्तीवरील नागरिकांना रस्त्या अभावी अक्षरशः चिखलातून गुडघ्या एवढ्या चिखलातून पायपीट करत प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्ता अभावी वाहनांची देखील या ठिकाणावरून इजा करताना अडचण होत आहेत तसेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना देखील प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काकडे यांनी स्वतः चिखल तुडवत जाऊन रस्ते विकासाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष देखील वेधले.
एकीकडे लोक प्रतिनिधींकडून विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत तर कोट्यावधींची कामे मंजूर झाल्या असून विकास केला असल्याचं बोललं जात आहे मात्र वास्तव पाहिले असता शेवगाव मतदार संघामध्ये अक्षरशः रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.
तसेच जायकवाडी धरण अत्यंत जवळ असताना देखील शेवगाव मतदार संघामध्ये पाण्यासाठी महिलांना आजही संघर्ष करावा लागतोय यावर देखील वारंवार आंदोलने देखील झाली मात्र यावरती कोणताही ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही. आता त्याच पाठोपाठ मतदारसंघातीलच रस्त्याबाबत काकडे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे.
राजकीय वातावरण तापल! संदीप कोतकरांच्या जिल्हा प्रवेशाला विरोध
गाववाड्यावरील रस्त्यांना वाहनांनी तर सोडाच पायी देखील चालणे अत्यंत मुश्किल झाले आहे मात्र नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. असे यावेळी बोलताना जनशक्ती विकास आघाडीचे शिवाजीराव काकडे यांनी सांगितले.