Health Workers On Indefinite Strike Protest Begins In Ahilyanagar : राज्यभरातील आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याची भीती दाट झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे तब्बल 33 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर (Health Workers Strike) उतरले. अहिल्यानगरसह ( Ahilyanagar News) सर्व जिल्ह्यांत आंदोलक कर्मचाऱ्यांचा संघर्ष उफाळून आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेले तब्बल 33 हजार कर्मचारी शासन सेवेत कायमस्वरूपी समायोजन आणि विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यभर बेमुदत संपावर आहेत. या संपाचे पडसाद नगर जिल्ह्यातही उमटले असून जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलन करत आहेत.
ब्रेकिंग : इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी SC चे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी
आजपासून राज्यभर बेमुदत संप
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, NHM मध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावणाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी समायोजनासाठी शासन निर्णय (जीआर) जाहीर केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्याचबरोबर नवीन कर्मचाऱ्यांना वेतनातील तफावत, समान कामासाठी समान वेतन, ईपीएफ, विमा यांसारख्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुसळधार पावसात भरधाव थारची रिक्षाला धडक! 5 जणांचा जागीच मृत्यू, चिपळूणमध्ये भीषण अपघात
एकूण 18 मागण्या
राज्यभरातील या संपात 33 हजार कर्मचारी सहभागी झाले असून नगर जिल्ह्यातील एक ते दीड हजार कर्मचारीही यात सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी एकूण 18 मागण्या पुढे केल्या असून त्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
रुग्णसेवांवर ताण पडणार
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच जिल्हा रुग्णालयांमधील सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णसेवांवर ताण पडणार असून सामान्य जनतेला मोठा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही तर संप अधिक तीव्र केला जाईल. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य शासन मोठ्या अडचणीत येऊ शकते.