Chandrashekhar Bawankule On Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरात आंदोलन होत आहे. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आला होता मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाला असून शहरातील महाल भागात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. या राड्यात पोलिसांवर दोन्ही गटाकडून दगडफेक (Nagpur Violence) करण्यात आली तसेच खाजगी मालमत्तेला नुकसान पोहचवण्यात आला. तर आता या प्रकरणात राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देत घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ते लवकरच कळेल, आमची सोशल मीडियावर बारीक नजर आहे. असं म्हटले आहे. बावनकुळे आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सोमवारी महाल परिसरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 45 जणांना अटक केली आहे तर आता देखील धरपकड सुरु आहे. मूळ कारणापर्यंत पोलिस पोहचत नाही, तोपर्यंत आपल्याशी बोलणे योग्य नाही. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ते लवकरच कळेल. सोशल मीडियावर आमची बारीक नजर आहे. असं बावनकुळे म्हणाले.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे पुढे म्हणाले की, शांतताप्रिय नागपुरात दुर्भाग्यपूर्ण घटना घडली असून 33-34 पोलीस जखमी झाले आहे. तर काही अधिकारी आणि पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. याचबरोबर पाच नागरिकांनाही मारहाण झाली असल्याची माहिती त्यावेळी बावनकुळे यांनी दिली. तसेच 45 वाहनांची तोडफोड करण्यात आली असं देखील बावनकुळे म्हणाले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार पण…, नागपूर हिंसाचार प्रकरणात वडेट्टीवार सरकारवर भडकले
नागपूर शहरांमध्ये शांतता राखणे आणि सोशल मीडिया अकाउंटवर ज्या चुकीच्या बातम्या, अफवा पसरल्या जातात त्यावर आमचे लक्ष आहे. प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे. कुणी अफवा फसरवल्या, ते आम्ही शोधत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.