अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे काजवा महोत्सवाला गेलेले 500 पर्यटक ‘सांधण व्हॅली’ म्हणजे सांधण दरीत अडकले होते परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्व पर्यटक सुखरूप बाहेर काढले आहे. काल झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हे सर्व पर्यटक या दारी अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
भंडारा येथील ही दरी जग प्रसिद्ध आहे येथे रोज हजारो पर्यटक येथ असतात. सध्या भंडाऱ्यामध्ये काजवा महोत्स सुरु आहे. त्यामुळे हा महोत्सव पाहण्यासाठी येथे पर्यटकांची रींग लागली आहे. आणि काल रविवार असल्याने येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातील जवळपास 500 पर्यटक दरीत अडकले होते. परंतु त्यांना सुखरूप बाहेर काढ्यात आले आहे.
भंडारा येथे गेल्या दोन दिवसापासून काजवा महोत्सव सुरु आहे. त्यातच शनिवार आणि रविवार दोन दिवस सलग सुट्या आल्याने महोत्सवासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात हजारो पर्यटक आले होते. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले. सर्वत्र लोकच दिसत होते. काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा आनंद घेतला होता. तर काही पर्यटक रविवारी रात्री महोत्सव पाहण्यासाठी तेथे थांबले होते. हे पर्यटक रविवारी सायंकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी सांधण दरी पाहण्यासाठी गेले. आणि अचानक सोसाड्याच वारा आणि पाऊल आल्याने हे सर्व पर्यटक त्या दरीत अडकले. परंतु वेळीच मदार मिळाल्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारात ही दरी आहे. पर्यटक मोठ्या संख्येन येथे ट्रॅकिंगसाठी येत असतात.