Ganapati Vidyalaya Residential Ashram School : जालन्यातील (Jalna) भोकरदनमध्ये गणपती विद्यालयाच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात (Ganapati Vidyalaya Residential Ashram School) राहणाऱ्या सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालवीर पवार (Balveer Pawar) असं खून करण्यात आलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत याच निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती अजयकुमार बन्सल (Ajay Kumar Bansal), पोलीस अधीक्षक जालना यांनी दिली आहे.
या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरु आहे. किरकोळ भांडणातून खून झाला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली आहे.
नेमकं घडलं काय?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जालन्यातील भोकरदन परिसरात असणाऱ्या गणपती विद्यालय निवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहातील एका रुममध्ये सात वर्षीय बालवीर पवार या विद्यार्थ्याची दोरीने गळा आवळून हत्या करण्यता आली आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास किरकोळ वादातून त्याच वस्तीगृहात राहणाऱ्या 8 वर्षीय आणि 14 वर्षीय विद्यार्थ्यांनी बालवीर पवार याची दोरीने गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.
Pak vs Ban : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बांगलादेशने मालिका जिंकली
भोकरदन पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी या हत्येची कबुली दिल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.