Case File Against Vasant Deshmukh : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं आहे. संगमनेरमधील धांदरफळमध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांची सभा झाली. (Jayshree Thorat) या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर संगमनेर मतदारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काँग्रेस आणि विखे समर्थकांनी अनेक ठिकाणी गाड्या पेटवल्या आहेत. (Vasant Deshmukh) तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणत दगडफेक करण्यात आली आहे. सध्या संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात वातावरण चिघळल आहे. दरम्यान, जयश्री थोरात या रात्रभर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत्या. खेर पहाटेच्या सुमारास वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी दगडफेक अन् जाळपोळ
वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणाले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे.
सत्यजीत तांबे काय म्हणाले ?
सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे. या वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल. त्यानंतर जयश्री थोरात यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर वसंतरा देशमुखवर गुन्हा दाखल.#jayshrithorat pic.twitter.com/foqiJmNx66
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 26, 2024