बापाविषयी बोलाल तर! तुम्ही वडिलांकडून धडे घ्या; विखेंचा थोरातांना खोचक सल्ला
Radhakrushna Vikhe On Jayshree Thorat : जयश्री थोरात (jayshree Thorat) नासमज, त्यांनी वडिलांकडून धडे घ्यावेत, असा खोचक सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thoarat) यांची कन्या जयश्री थोरात यांना दिलायं. दरम्यान, युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना थोरात यांनी विखे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवलायं. त्यावर अधिक भाष्य न करता विखेंनी थोरातांना खोचक सल्ला दिलायं.
मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, जयश्री थोरात नासमज, त्यांनी वडिल बाळासाहेब थोरात यांच्याकडून धडे घ्यावे, नासमज व्यक्तीने केलेल्या विधानावर मी काय भाष्य करणार, या शब्दांत राधाकृष्ण विखे पाटलांनी जयश्री थोरात यांना सल्ला दिलायं.
फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’; उमेदवारी रद्द करण्यासाठी ‘आई’ ची धावाधाव
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून संवाद यात्रा मेळावे आयोजित केले जात आहेत. या मेळाव्यांमधून राजकीय नेत्यांचे एकमेकांवर जोरदार आरोप -प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सुजय विखे संगमनेर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तळेगावमध्ये आयोजित कार्यक्रमातून सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता.
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला; स्थानिक अन् परराज्यातील ७ कामगारांचा मृत्यू
काय म्हणाले होते सुजय विखे?
आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे. तालुक्यात परिवर्तन होणार. यात महिलांचा खूप मोठा वाटा असणार. दहशत झुगारून परिवर्तनासाठी ठेकेदारी संस्कृतीविरोधात युवकांनी उभं राहावं. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे, यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाही, असा घणाघात सुजय विखे यांनी थोरात यांच्यावर केला होता.
जयश्री थोरातांचं प्रत्युत्तर…
बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचे स्वाभिमान आहेत, संगमनेरकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. माझ्या बापाविषयी बोलाल तर याद राखा, ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार, या शब्दांत जयश्री थोरातांनी विखेंना प्रत्युत्तर दिलंय.
ठरलं! निवडून येतील त्याच मतदारसंघात उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राजकीय नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच थोरात आणि विखे कुटुंबियांचा वाद राज्याला नवीन नाही. त्यात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांचं हे विधान सध्या राज्यात चांगलच चर्चेत आलंय.