संगमनेरातून थोरात यांच्या कन्याही विधानसभेच्या रिंगणात? प्रणिती शिंदे यांचे मोठे विधान

संगमनेरातून थोरात यांच्या कन्याही विधानसभेच्या रिंगणात? प्रणिती शिंदे यांचे मोठे विधान

Praniti Shinde : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिलांसाठी चांगले काम सुरु आहे, त्या राजकारणातही नेतृत्व करु शकतात, या शब्दांत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सूचक विधान केलंय. संगमनेरमध्ये थोरात यांच्या पुढाकारातून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यादरम्यान, प्रणिती शिंदे बोलत होत्या. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या जयश्री थोरात दिसणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The Buckingham Murders: करीना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’​चा थक्क करणारा ट्रेलर प्रदर्शित

मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून विविध मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. दिग्गज ऑन बरोबरच आता यांना नवे चेहरे देखील विधानसभेच्या रिंगणात दिसतील. दरम्यान, त्यापूर्वीच आता मिळावे सभा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेतेमंडळांकडून आयोजन केले जात आहे. अशातच संगमनेरमध्ये महिला मेळावा पार पडला. मागील अनेक वर्षांपासून जयश्री थोरात यांचं महिलांच्या सक्षमीकरणासाठी चांगलं काम सुरु आहे, त्या राजकारणातही नेतृत्व करु शकतात, असं शिंदे म्हणाल्या आहेत.

मोठी बातमी! अहमदनगरचं ‘अहिल्यानगर’ होणार; नामांतरास रेल्वे मंत्रालयाचाही ग्रीन सिग्नल..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं असून या मेळाव्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी शिंदे यांना थोरात विधानसभा निवडणुकीत उतरणार का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना शिंदे म्हणाल्या, जयश्री थोरात यांचे महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम असून राजकारणात देखील ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील बाळासाहेब थोरात यांच्या दोन्ही मुली तसेच त्यांची बहीणही राजकारणामध्ये चांगलं काम करतात, त्यामुळे ते राजकारणात देखील चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात, या शब्दांत एक प्रकारे शिंदे यांनी जयश्री थोरात यांना विधानसभेसाठी पाठबळ दिले आहे.

CBI ची मोठी कारवाई, आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

दरम्यान, शिंदे यांच्या सूचक विधानानंतर जयश्री थोरात यांनीही विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीयं. भविष्यात मीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जयश्री थोरात यांनी केलंय. त्यामुळे आता बाळासाहेब थोरातांच्या कन्याही आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube