The Buckingham Murders: करीना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’​चा थक्क करणारा ट्रेलर प्रदर्शित

The Buckingham Murders: करीना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’​चा थक्क करणारा ट्रेलर प्रदर्शित

The Buckingham Murders trailer Out: करीना कपूर खान (Kareena Kapoor) यावर्षी तिचा दुसरा चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ साठी (The Buckingham Murders) सज्ज आहे. करिनाचा ‘क्रू’ (Crew) हा चित्रपट यावर्षी रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिट ठरला. आता करिनाच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटाचा (The Buckingham Murders trailer) शानदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘द बकिंगहॅम मर्डर्स’चा टीझर (The Buckingham Murders teaser) नुकताच प्रदर्शित झाला. आता निर्मात्यांनी या क्राईम थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये करीना कपूर खान (Kareena Kapoor) तिच्या बॉस लूकने चाहत्यांना प्रभावित करत आहे. मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी निघालेली करीना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर गंभीर अभिनयासाठी सज्ज झाली आहे.

‘द बकिंगहॅम मर्डर्स’चा अप्रतिम ट्रेलर

बालाजी मोशन पिक्चर्सने आपल्या यूट्यूब चॅनलवरून करीना कपूरच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. यामध्ये करीना गुन्हेगारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलत आहे. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा सस्पेन्स आणि रहस्याने भरलेला आहे, हे ट्रेलरवरून स्पष्ट होते. हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर सिनेमा असून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, द बकिंगहॅम मर्डर्स 13 सप्टेंबरला थिएटरमध्ये येत आहे, ज्याचे दिग्दर्शन हंसल मेहता करत आहेत आणि यात करीना कपूर प्रमुख भूमिकेत आहे’.

The Buckingham Murders: करीनाच्या ‘द बकिंघम मर्डर्स’चा टीझर प्रदर्शित, या अंदाजात दिसतेय बेबो

प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. मामी चित्रपट महोत्सव २०२३ च्या ओपनिंगचा मान या चित्रपटाने पटकावला होता. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लाल सिंह चड्ढानंतर अभिनेत्री ‘जाने जान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ शिवाय करीना ही ‘सिंघम अगेन’मध्येही झळकणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube