जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला; स्थानिक अन् परराज्यातील ७ कामगारांचा मृत्यू

  • Written By: Published:
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला; स्थानिक अन् परराज्यातील ७ कामगारांचा मृत्यू

Terrorist Attack In Jammu and Kashmir Ganderbal : जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये काल रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी स्थानिक आणि परराज्यातील मजुरांवर गोळीबार केला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. (Kashmir) तर, काही जण जखमी झाले आहेत. सोनेनबर्ग येथील एका बांधकामाधीन बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. डॉ. शाहनवाज, फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल, अनिल शुक्ला आणि गुरमीत सिंग अशी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. तर, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सैनिकांनी सदरील परिसराची नाकेबंदी केली आहे.

Congress First list : मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित; महत्त्वाची नावं आली समोर

संपूर्ण परिसराची नाकेबंदी

मध्य काश्मीर आणि गंदरबल जिल्ह्याला जोडणाऱ्या झेड मोड बोगद्याच्या बांधकामावर काम करणाऱ्या अधिकारी आणि मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या सुरक्षा दलाचे पथक दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहे. या घटनेबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

गोळीबाराच्या घटनेवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी “सोनमर्ग भागातील गगनीर येथे स्थलांतरित मजुरांवर भ्याड हल्ल्याची दुःखद घटना घडली आहे. हे कर्मचारी परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम करत होते. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. या नि:शस्त्र निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.” अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्र्‍यांकडून देण्यात आली.

स्थलांतरित मजुरांवर दहशतवादी हल्ले

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कामगारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये पंजाबचा रहिवासी असलेल्या गुरमीत सिंगचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बिहारमधील आणखी तीन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी कामगारांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये बिहारमधील एका मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थलांतरित मजुरांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात दोन स्थलांतरित मजुरांचाही मृत्यू झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या