Vidhansabha : पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंचं टेन्शन

  • Written By: Published:
Vidhansabha : पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंचं टेन्शन

Balasaheb Thorat : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रि‍पदावरून कुरबुरी सुरू आहेत. आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं आहे.

Shreya Chaudhary: ‘द मेहता बॉईज’च्या शिकागो प्रीमियरबद्दल अभिमान’, अभिनेत्रीने स्पष्ट सांगितलं 

महाविकास आघाडीचा आणि तोही कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असं थोरात यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हानिहाय आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महायुती सरकारला सत्तेचा अहंकार झाला. सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे. आजही वाडा वस्तीवर 50 खोके, एकदम ओके विसरले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात महायुतीने भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, चार दिवसांनी त्यांनाच सरकारमध्ये घेऊन तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दूंगा, म्हणणाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेवर आणले, अशी टीका थोरात यांनी केली.

स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवला तर…; आदित्य ठाकरेंचे सीएम शिंदेंवर टीकास्त्र 

यावेळी थोरातांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगले काम करण्याचे आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला 100 टक्के खात्री आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आणि तोही कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असं थोरात म्हणाले.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असं अनेकदा बोलून दाखवलं. एवढेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांना सांगावं, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता थोरातांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube