स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवला तर…; आदित्य ठाकरेंचे सीएम शिंदेंवर टीकास्त्र
Aditya Thackeray : आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
The Sabarmati Report: ‘द साबरमती रिपोर्ट’ रिलीजची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
राजवटीचे मोजके दिवस उरले असतांना महामंडळ देऊन गद्दारांना गप्प केलं, स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात तर असाच विश्वास घात होता, असं आदित्य ठाकर म्हणाले.
खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी ३ गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं… ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 19, 2024
काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही नेत्यांच्या मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या महामंडळावर नियुक्त्या केल्या. त्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी तीन गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं…. ज्यांना राज्यपाल, मंत्रिपदाची चॉकलेटं दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं. 33 देशांत गद्दार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असतांना ही मंडळं देऊन गप्प केलं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
पुण्यात कामाच्या तणावामुळे सीए तरुणीचा मृत्यू; चौकशी करा केंद्राचे आदेश, अजितदादांनीही लक्ष वेधलं
पुढं त्यांनी लिहिलं की, कौतुक आहे ह्याचं… काय स्वप्नं घेऊन पळाले होते! एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात तर असाच विश्वास घात होता.
बरं, हे होत असताना अजून कौतुक वाटतं ते भाजप कार्यकर्त्यांचं… 2 वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्षात फूट पाडून, कुठल्याच खऱ्या भाजप कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधेंनी परस्पर पदं देऊन टाकली.. ह्याचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपला काय मिळालं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.