Robbery Jlewarli Shop In Kharghar : नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्वेलरीच्या (Jlewarli ) दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आलाय. येथील खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्समध्ये रात्री 10 वाजता हा दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे हा दरोडा टाकण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.
Crime: शिवसेना शिंदे गटातील नेत्याच्या मुलाची हत्या; रिक्षा चालकाशी झालेला वाद जीवावर बेतला
बंदुकीच्या धाकावर 3 दरोडेखोरांनी ज्वेलर्सचं दुकान लुटलं आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या भीषण घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण, चोरट्यांनी अगदी बिनधास्तपणे, कोणत्याही भीतीविना हा दरोडा टाकला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार चोरट्यांचा शोध खारघर पोलीस घेत आहेत. दरोडेखोरांनी 2 राउंड फायर देखील केल्याची माहिती आहे. चोरटे टू-व्हीलरवर दरोडा टाकण्यासाठी आले होते. त्यांनी हेलमेट घालून बीएम ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला अन् त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी दुकानात असलेले दागिने लुटले आहेत. एकूण किती रुपयांचा माल त्यांनी पळवलाय हे अद्याप समजू शकलेलं नाही.
भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक
दरोडा टाकल्यानंतर ते बाहेर उभे असलेल्या आपल्या टूव्हीलरवर बसले. यावेळी काहींनी त्यांच्या पाठलाग गेला. याचवेळी त्यांनी दोन राऊंड फायरिंग केली. त्यामुळे लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचं सोडून दिलं. सदर घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं पाहायला मिळतय. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाहीये का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्वेलरीच्या दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल!#Theftjewelrystore #kharghar #VideoViral pic.twitter.com/r7s9r6qbxW
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 29, 2024