Pune : गजबजलेल्या रविवार पेठेत दरोडा! 3.32 कोटीचं सोनं अन् लाखोंची रक्कम घेऊन भामटे पसार
Pune News : सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागत केले जात असतानाच (Pune News) पुण्यात मोठा दरोडा पडला. 31 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी रविवार पेठेतील (Raviwar Peth Area) सराफा दुकान फोडलं. या दुकानातील तब्बल 5 किलो सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी दुकादाराने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी (Pune Crime News) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाच किलो सोन्याबरोबरच दहा लाख रुपयेही चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या चोरीच्या घटनेने सोने व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली आहे.
या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. चोर पांढऱ्या रंगाची टोपी घालून आल्याचं दिसत आहे. त्यानंतर या चोरट्यांनी लॉकर तोडून सोनं बॅगेत भरलं. इतकंच नाही तर चोरट्यांनी सगळं लॉकरच रिकामं केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार तपासाला सुरुवात केली आहे. या चोरट्यांकडे दुकानाची बनावट चावी होती. या चावीच्या मदतीने दुकानात प्रवेश करून त्यांनी चोरी केली अशीही माहिती समोर येत आहे. या प्रकरणाच्या तपासाकामी एक पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांची एक टीमही तयार करण्यात आली आहे. चोरीची घटना मोठी आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
दुकानात प्रवेश करण्यासाठी जबरदस्ती झाल्याचं कुठेच दिसून येत नाही. बनावट चावी तयार करून चोरटे सहज दुकानात शिरले. त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आहे. या सगळ्या गोष्टींचा बारकाईने तपास करण्यात येईल. सोन्याच्या दुकानातून तब्बल पाच किलो सोनं आणि दहा लाख रुपये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरीची घटना मोठी असल्याने पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
पुणे : नवीन वर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद तरुणीचा राडा; बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचा दावा
दरम्यान, पुण्यात सध्या चोरी आणि गुंडगिरीच्या घटना वाढल्या आहेत. टारगटांकडून सर्वसामान्यांना त्रास देण्याचे प्रकारही होत असतात. यामुळे पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.