Pune News : ‘नोटांवर बोस, सावरकर अन् टिळकांचाही फोटो हवा’, प्रसिद्ध लेखकाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pune News : ‘नोटांवर बोस, सावरकर अन् टिळकांचाही फोटो हवा’, प्रसिद्ध लेखकाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pune News : पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या (Pune News) पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चलनी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, लाला लाजपतराय, लोकमान्य टिळक यांचे देखील फोटो असायला हवेत, असे मत संपत यांनी व्यक्त केले. मी उजव्या किंवा डाव्या विचारसरणीला वाहिलेला लेखक नसून राष्ट्रवादी विचारांसाठी लिहिणारा इतिहासकार आहे, असेही संपत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज-गैरसमज’ या विषयावर संपत बोलत होते. या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. मुलाखत सुरू असतानाच प्रेक्षकांतून त्यांना विचारण्यात आलं की भविष्यात चलनाव सावरकर आणि लोकमान्य टिळकांचा फोटो दिसू शकतो का, त्यावर उत्तर देताना संपत म्हणाले, मला तो दिवस आवडेल जेव्हा असं काही होईल. पण, त्याचबरोबर नोटांवर सावरकरांबरोबरच नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लाजपतराय, लोकमान्य टिळक यांचेही फोटो असायला हवेत. हे सुद्धा आपले खरे हिरो आहेत. नोटांवर फक्त एकच फोटो का असावा, असा सवाल करत संपत यांनी इंडोनेशियाचे उदाहरण दिलं. इंडोनेशियातील चलनी नोटांवर वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो आहेत. तसंच आपल्याकडेही असायला हवं असे संपत म्हणाले.

Pune News : पुण्यातील भिडेवाडा अखेर महापालिकेच्या ताब्यात; पोलीस बंदोबस्तात कारवाई

सावरकरांचा इतिहास माहिती नसताना काही लोक त्यांच्यावर विनाकारण टीका करत असतात. सावरकरांवर प्रेम करा किंवा त्यांचा विरोध करा. मात्र, त्यांच्याबाबतचे तथ्य जाणून घ्या नंतरच त्यांच्याबद्दलचे आपले मत व्यक्त करा असे आवाहन संपत यांनी केले. हिंदुत्व हे जातीपातींच्या विरोधात आहे हे सगळ्यात आधी सावरकरांनीच पटवून दिलं. तरी दखील राजकीय पक्षांनी फायद्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वापर केला, अशी खंतही संपत यांनी यावेळी व्यक्त केली. सावरकर यांना परराष्ट्रीय आणि संरक्षण धोरणाची उत्तम जाण होती. त्यामुळेच त्यांनी केलेली भाकितं आज खरी होताना दिसत आहेत, असे विक्रम संपत यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube