Crime: शिवसेना शिंदे गटातील नेत्याच्या मुलाची हत्या; रिक्षा चालकाशी झालेला वाद जीवावर बेतला

Crime: शिवसेना शिंदे गटातील नेत्याच्या मुलाची हत्या; रिक्षा चालकाशी झालेला वाद जीवावर बेतला

Thane Crime :   ठाण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील ठाणे जिल्ह्याचे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांची विरारच्या अर्नाळामध्ये (Crime) हत्या करण्यात आली आहे. मोरे हे अचानक कोसळतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक

मोरे हे नवाबपूर येथील सेवन सी रिसॉर्टमध्ये कुटुंबीयासमवेत आले होते. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या बाहेर रिक्षाचे चाक पायावरून गेल्याने त्यांची याठिकाणी काही जणांसोबत बाचाबाची झाली. यावेळी काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन, तत्काळ पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी फोनवरून चर्चा करून योग्य ती कारवाही करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी सांगितलं.

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी PMPMLचे कर्मचारी आक्रमक, पुण्यात पुकारंल कामबंद आंदोलन

मृत मिलिंद मोरे वय वर्षे ४७ हे आपल्या कुटूंबासोबत ठाण्यात राहत होते. त्यांचे वडील रघुनाथ मोरे धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. रघुनाथ मोरे हे शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख सह विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. काल रविवारी विरारच्या नवापूर येचीतर सेव्हन सी बीच रिसॉर्ट येथे सहलीसाठी आले होते.

मोरे यांच्या पुतण्याला एका रिक्षा चालकांनी धडक दिली त्यावरून वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि सदर रिक्षा चालक स्थानिक असल्याने आपल्या साथीदारांना बोलवून मोरे यांच्यासह त्याच्या सोबत आलेल्या तीन ते चार मित्र परिवाराला मारहाण केली.

या मारहाणीत मोरे यांना वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदवविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube