मुंबई, ठाणे, पुणे सुसाट.. जिल्हा उत्पन्नात टॉप; विदर्भ, मराठवाडा पुन्हा पिछाडीवर
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Mumbai News : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला. या अहवालातून राज्यातील जिल्ह्यांचंही दरडोई उत्पन्न समोर आलं आहे. यावेळी राज्यात मुंबई, पुण्याने बाजी मारली आहे. मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तर विदर्भासह मराठवाड्यातील जिल्हे पिछाडीवर पडले आहेत. मुंबई पुण्यासह (Mumbai News) पश्चिम महाराष्ट्रात उद्योगांचे जाळे आहे. त्यामुळे या भागात रोजगार आणि आर्थिक उलाढाल जास्त आहे. या उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असले तरी प्रादेशिक असमतोल अजूनही कायम आहे.
पहिल्या सुधारीत अंदाजानुसार सन 2022-23 मधी सांकेतिक राज्य उत्पन्न म्हणजे चालू किंमतीनुसार निव्वळ राज्य उत्पन्न 31 लाख 79 हजार 566 कोटी रुपये अपेक्षित आहे. दुसऱ्या सुधारीत अंदाजानुसार सन 2021-22 मधील सांकेतिक राज्य उत्पन्न 27 लाख 44 हजार 773 कोटी रुपये अपेक्षित आहे. सन 2022-23 चे अंदाजित दरडोई राज्य उत्पन्न 2 लाख 52 हजार 389 रुपये असून 2021-22 मध्ये 2 लाख 19 हजार 573 रुपये इतके उत्पन्न होते.
मुंबई पुणे सुस्साट
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या उत्पन्नात कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे आघाडीवर दिसत आहेत. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 4 लाख 12 हजार 690 रुपये इतकं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न मुंबई ठाण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्याचं एकूण दरडोई उत्पन्न 3 लाख 36 हजार 503 रुपये इतकं राहिलं आहे.
कोकण विभाग-सरासरी 3, 64, 668
मुंबई-4, 12, 690
ठाणे-3,53, 299
रायगड-2, 87, 397
रत्नागिरी-2,21,454
सिंधुदुर्ग-2, 60, 304
नाशिक विभाग-सरासरी-1,97,227
नाशिक-2,30,616
धुळे-1,79, 700
नंदुरबार-1,21,624
जळगाव-1,70,656
अहमदनगर-2, 21,423
पुणे विभाग-2,77,453
पुणे -3,36,503
सातारा 2,20,807
सांगली 2,24, 846
सोलापूर 2,25,650
कोल्हापूर 2,54,196
छत्रपती संभाजीनगर-1,73, 533
छत्रपती संभाजीनगर-2,08,336
जालना-1,71,080
परभणी-1,66,182
हिंगोली-1,35,723
बीड-1,60,956
नांदेड-1,60,547
धाराशिव-1,76,382
लातूर-1,74,178
अमरावती विभाग-सरासरी 1, 45, 917
बुलढाणा-1,27,035
अकोला-1,80,249
वाशिम-1,20,495
अमरावती-1,59,458
यवतमाळ-1,37, 061
नागपूर विभाग- 2,25,755
वर्धा-2,04, 735
नागपूर- 2,92,607
भंडारा-1,71, 357
गोंदिया-1,63,040
चंद्रपूर-2,06,060
गडचिरोली-1,20,883