Nitin Gadkari On PM Post : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केलाय. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण एक व्यक्ती मला म्हणाला होता, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. (Nitin Gadkari) त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणात चर्चेला उधान आलं आहे.
उद्योग विभागात भ्रष्टाचार, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात अन् तामिळनाडूत; काँग्रेस नेत्याचा संताप
मी म्हणालो की, तुम्ही मला का पाठिंबा द्याल आणि मी तुमचा का पाठिंबा घेऊ? पंतप्रधान होणं हे काही माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझ्या संस्थेशी प्रामाणिक आहे. माझी ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे. माझी श्रद्धा हीच देशाच्या लोकशाहीचे सर्वात मोठं बलस्थान आहे असं आपण त्या व्यक्तीला बोलल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
माझ्याशी संपर्क साधला
नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मी नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मी अशा पक्षात आहे ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिले आहे. कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही.” असं असलं तरी नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव उघड केले नाही किंवा घटनेची माहितीही दिली नाही. ते म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केलाय. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली याबाबत खुलासा केलाय. #NitinGadkari #nitingadkarionpmpost #NDA pic.twitter.com/EzgAuZkhSe
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 15, 2024