Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत महत्वाची बैठक पार पडली. साधारण साडेचार तास बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे उपस्थित होते. स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाली. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा निवडून तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जिंकून येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे, यावर विचार विनिमय केला जात असल्याचं कळतं. निवडणुकीला सामोरं जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षानं टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निगडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवं. प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याच बरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीत सखोल चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
NCP Symbol Case : विधानसभेपूर्वी अजित पवारांना धक्का, मिळणार नवीन चिन्ह?
निवडणुकीत तिन्ही पक्षांची भूमिका एकच असायला हवी. एकमेकांवरील टीका, टिपण्णी आणि चिमटे टाळा, असा सल्लाही बैठकीत सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे तीनही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा जागांची घोषणा सर्वात शेवटी करून नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावर बैठकीत एकमत झालं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकदीनं जागा निवडून आणण्यावरही तिनही पक्षातील प्रमुख नेत्यांचं एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कुठल्या मुद्यांवर भर
तीन पक्षाचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणांसंदर्भातही विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिंकूण येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे, यावर विचार विनिमय झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षानं टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निघडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवं, या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच प्रचार आणि सभांची जबाबदारी, त्याच बरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीत सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.