Download App

Video : मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा.., हत्या झालेल्या बीडच्या मुलाचा कराडसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मित्रासोबत पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची पोलिसांकडून माहिती दिली. पोलिसांनी यशची हत्या करणाऱ्या मित्राला अटक केली आहे.

  • Written By: Last Updated:

गेली अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेले गुन्हेगारीचे प्रकरणं काही थांबायचं नाव घेत नाहीत. (Beed) नुकतीच बीडमधील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची हत्या झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली. दरम्यान, या हत्येनंतर एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मित्रासोबत झालेल्या वादातून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची पोलिसांकडून माहिती देण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी यशची हत्या करणाऱ्या मित्राला 24 तासात अटक केली आहे. त्यानंतर आता यश ढाका याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये वाल्मिक कराडसोबतचा यशचा फोटो असलेला व्हिडीओ आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा झाला अतिरेक! तब्बल 104 जणांचा घेतला बळी, वाचा सविस्तर अहवाल

यश ढाका या 22 वर्षीय इंजिनिअरिंगचच्या तरुणाची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या यश ढाकाचा जुना फोटो व्हायरल होत असून अनेक चर्चा रंगल्या आहेत. या फोटोमध्ये यश संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसोबत दिसत आहे. एका कार्यालयातील हा फोटो असून, वाल्मिक कराड खुर्चीवर बसलेला असून, यश शेजारी उभा असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

याच फोटोचा एका हिंदीतील संवादासोबत व्हिडीओ बनवण्यात आलेला असून ‘मैं अपने आप को पुलिस के हवाले कर रहा हूँ, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से मैं तो छुट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरा दोस्त, तेरा क्या होगा?’, असा हा संवाद तुम्हाला ऐकायला मिळतोय. हाच व्हिडीओ यश ढाकाच्या हत्येनंतर व्हायरल झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बीड शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण पाहता, पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.

कसं घढलं हे हत्याकांड?

बीड शहरातील गजबलेल्या चौकात गुरुवारी, २५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजता स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा २२ वर्षीय मुलगा यश ढाका (अभियांत्रिकीचे विद्यार्थी) याची मित्राने चाकूने हत्या केली. पूर्ववैमनस्यातील किरकोळ वाद वाढला आणि यशला सपासप वार करून खून झाला.

हत्येची घटना कशी घडली?

यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात किरकोळ वाद झाला. वाद चिघळताच सूरजने चाकू काढून यशच्या छातीत सपासप वार केले. यश रक्तबंबाळ झाला आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हत्येचे कारण काय?

महिनाभरापूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत यश आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. या जुन्या वैरातून गुरुवारी रात्री पुन्हा वाद वाढला आणि हत्या झाली, असं पोलीस तपासात समोर आलं.

आरोपी सूरज काटे कोण आहे?

सूरज काटे हा यशचा मित्र आहे. हत्येनंतर तो फरार झाला, पण पोलिसांनी २४ तासांत अटक केली. त्याच्यावर खूनाचा गुन्हा (IPC कलम ३०२) दाखल आहे.

follow us