Download App

‘मेन इन ब्ल्यू’ आदित्य ठाकरेंनी बदलला त्यांचा लकी रंग; दिसले वेगळ्या शर्टमध्ये

Aaditya Thackeray in Budget Session :  राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडताना आपण पाहिले आहेत. अनेक युवा आमदार हे रोखठोक आपली भूमिका मांडत असतात. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरताना दिसून आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यापासून आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करताना दिसत आहेत. त्यांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा सर्व भागात सभा घेतल्या आहेत. तसेच गेल्या आठ महिन्यांमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहात सरकारच्या विरोधात देखील जोरदार आवाज उठवला आहे. आजही सभागृहात त्यांनी सरकारला विविध विषयांवरुन प्रश्न विचारले.

आधी भाकरी-चाकरीवरुन खडाजंगी अन् मग आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन हास्यकल्लोळ

पण आदित्य ठाकरे हे आज वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळाले. जवळपास गेली आठ महिने आदित्य ठाकरे हे आपल्या आकाशी निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेमध्ये देखील आकाशी निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. पण आज आदित्य ठाकरे हे राखाडी रंगाचा चेक्सचा शर्ट घालून सभागृहात आल्याचे पहायला मिळाले आहे.

याआधी एकदा शिंदे गटावर टीका करताना त्यांनी ते मला विचारतील की, आदित्य ठाकरे फक्त निळ्या रंगाचा शर्ट का घालतात, असा टोला देखील लगावला होता. दरम्यान आज सभागृहामध्ये आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टोलेबाजी देखील केली.

Aditya Thackeray यांचे टेन्शन वाढले ? वरळीत काय होणार…?

त्याचे झाले असे की, आमदार बच्चू कडूंनी कामगारांच्या लग्नावरुन प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही आदित्यजींकडे बघून प्रश्न विचारला का?, अशी मिश्किल टिपणी केली. फडणवीसांच्या या प्रतिप्रश्नानं सभागृहात एकच हशा पिकला. एवढचं नव्हे तर, सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे फडणवीस म्हणाले.

यावर आदित्य ठाकरेंनी ही काही राजकीय धमकी आहे का, आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा वगैरे अशी मिश्किल टिप्पणी केली. एवढ्यावरच हा विषय थांबतोय असं वाटतं असतानाच नार्वेकरांनी री ओढत आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं.” असं विधानं केलं. त्यावर फडणवीसांनी कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न हे मी अनुभवातून बोलतोय असं विधान केले.

Tags

follow us