Aaditya Thackeray : मुंबईत उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. यातच मुंबईमधील टँकर चालक संपावर गेल्याने मुंबईत पाण्याचा संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज या संपाचा दुसरा दिवस होता. तर आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची (Mumbai Water Issue) अडचण येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 11 दिवसांनी पाणी येतो तर आता मुंबईत देखील परिस्थिती बिकट होत आहे. मुंबईमधील टँकर संघटना संपावर गेल्या आहे. या संपाचा आज दुसरा दिवस होता. टँकर संघटना मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पुरवठा करतात. त्यांनी या संपाची माहिती एका आठवड्यापूर्वी दिली होती. काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातुन मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना आहवान करत नागरिकांना माहिती देण्याची विनंती केली होती. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईमधील टँकर चालकांनाचा संप नवीन नाही आणि त्यांच्या मागण्या देखील काही जास्त नाही. सरकारकडून त्यांना फक्त आश्वासन मिळत आहे. त्यामुळे हे संप कधीपर्यंत चालणार याची माहिती नाही. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या केंद्र सरकारकडे ठेवून ही समस्या सोडावे. पुढील 48 तासात पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा पाणी प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करणार असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.
सरकारने वचने पाळली नाही
तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून देखील राज्य सरकारवर जोरदार टीका करत आम्ही या विषयावर रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वी असं वाटत होते की यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र किती तरी ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणार मात्र सत्य परिस्थिती ही आहे की, बीएमसी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर आला नाही. आम्हाला तिथे लढा द्यावा लागला त्यानंतर पगार वेळेवर येत आहे.
Maruti Eeco 6-सीटर लाँच, भन्नाट फीचर्स, 6 एअरबॅग्ज अन् किंमत फक्त…
तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार मिळाला आहे. आज सरकारकडे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही उद्या दुसऱ्या सरकारी ऑफिसवर ही वेळ येईल असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकारने वचने पाळली नाही. कर्ज माफी केली नाही, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरवत होते ते लोक आता कुठे आहे असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.