Abdul Sattar : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याचे कारण म्हणजे या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आगामी निवडणुकांच्या तोंडावर अल्पसंख्यांक समाजासाठी आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार…
आजच्या मंत्रिमंडळामध्ये मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. आमच्या अल्पसंख्यक मौलाना आजाद फायनान्स कॉरपोरेशन ची स्थापना जेव्हा पासून झाली तेव्हा पासून अल्पसंख्यक समाजाच्या विद्यार्थांसाठी, व्यापाऱ्यांसाठी आम्ही कर्ज म्हणून देत होतो. आतापर्यंत 30 कोटी होते. आता 30 कोटी ऐवजी 500 कोटी केले. त्याला आज कॅबिनेटने मंजुरी दिली.
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर पास झाली! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स
अल्पसंख्यांक समाजाला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी हमी देण्याचं हा जो ठराव झाला. तर काही दिवसांत त्याचे पैसे येतील आणि समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काम होतील. माझा विषय मी मांडला आहे. यावर मुख्यमंत्री तुम्हाला सविस्तर माहिती देतील. या रकमेचा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यापारासाठी फायदा होईल. अशी प्रतिक्रिया या निर्णयावर सत्तार यांनी दिली आहे.
काय आहे हा निर्णय?
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला अगोदर 30 कोटींचा निधी मिळत होता. तो निधी आता तब्बल 500 कोटींवर गेला आहे. अल्पसंख्यांक समाजाला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यामुळे या रकमेचा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यापारासाठी फायदा होईल.
पदवीधरांना नोकरीची संधी, नवी मुंबईच्या आरोग्य विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरू
दरम्यान सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत. तसं तसं सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमांतून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत. विजयाची पायाभरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अल्पसंख्यांक समाजाला आकर्षित करण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पुढील महिन्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामध्ये काय होणार? याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.