पदवीधरांना नोकरीची संधी, नवी मुंबईच्या आरोग्य विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरू
NMMC Bharti 2023: जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण पूर्ण घेतले असेल आणि नोकरीच्या उत्तम संधीची वाट पाहत असाल, तर नवी मुंबईत तुमच्यासाठी कामाची सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आरोग्य विभागांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान, नाक आणि घसा तज्ञ या पदांसाठी विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
ठाकरेंना नडले, राऊतांना भिडले… पण शिंदेंनी सोडले : टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामींना दिलासा
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी, उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
पदाचे नाव – फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान, नाक आणि घसा तज्ञ
शैक्षणिक पात्रता –
फिजिशियन – MD मेडिसिन/DNB
स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ – MD Peds/DCH/DNB
नेत्ररोगतज्ज्ञ – MS Ophthamologist/DOMS
त्वचाशास्त्रज्ञ – MD (Skin/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञ – MD मानसोपचार/DPM/DNB
कान नाक घसा तज्ञ – MS ENT/DORL/DNB
मोठी बातमी : टीम इंडियाचा हेड कोच पुन्हा ‘द वॉल’; BCCI कडून राहुल द्रविडला एक्सटेन्शन
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाइट – https://www.nmmc.gov.in/
जाहिरात
https://drive.google.com/file/d/10zDn1YwknS30PQptKVT86Ns1OwVXWZ-w/view
अर्ज प्रक्रिया: तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर आलेले आणि चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. महत्वाचं म्हणजे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.